मुंबई मेट्रो-१चे घाटकोपर आणि अंधेरी मेट्रो स्थानक परिसरात ‘एमएमआरडीए’ने बांधलेले स्कायवॉक या स्थानकांना जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मुंबई- मुंबई मेट्रो-१चे घाटकोपर आणि अंधेरी मेट्रो स्थानक परिसरात ‘एमएमआरडीए’ने बांधलेले स्कायवॉक या स्थानकांना जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असून, लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
मेट्रो सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रतिसाद मिळतो आहे. हा परिसरही वर्दळीचा असल्याने मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यास वाहतूक पार करून जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन आधी बांधलेले स्कायवॉक वाढवून मेट्रो स्थानकाला जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. स्कायवॉक मेट्रोच्या स्थानकांना जोडल्यास कनेक्टिविटी होऊन प्रवाशांना मेट्रोपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
स्कायवॉकचे बांधकाम वाढवण्यासाठी कोणत्या अडचणी येतील, त्या दूर करण्यासाठी काय करावे लागेल आदी बाबी तपासण्यासाठी पवईच्या आयआयटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. स्कायवॉकचा आराखडा व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.