भाजपचा खोटारडेपणा उघड करणा-या ‘जिंकणारच’ आणि ‘मोदींनी केली जनतेची फसवणूक’ या पुस्तिकांचे प्रकाशन काँग्रेसच्या प्रचार समितीतर्फे रविवारी होणार आहे.
मुंबई – भाजपचा खोटारडेपणा उघड करणा-या ‘जिंकणारच’ आणि ‘मोदींनी केली जनतेची फसवणूक’ या पुस्तिकांचे प्रकाशन काँग्रेसच्या प्रचार समितीतर्फे रविवारी होणार आहे.
गांधी भवन येथील कॉँग्रेसच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणा-या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री आणि प्रचार समितीप्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे उपस्थित राहतील. लोकसभा निवडणूक काळात दिलेली खोटी आश्वासने, जनतेची केलेली दिशाभूल आदींची माहिती पुस्तिकेत असेल.