चंद्रपाल सिंग आणि एस व्हिडिओ पिक्चर्स यांच्या ‘भौरी’ या दुस-या हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच केली.
चंद्रपाल सिंग आणि एस व्हिडिओ पिक्चर्स यांच्या ‘भौरी’ या दुस-या हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच केली. चंद्रपाल सिंग आणि एस व्हिडिओ निर्मित आणि जसबीर बी. भाटी दिग्दर्शित या चित्रपटात प्रभावी कलाकारांचा सहभाग असून हा चित्रपट येत्या ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तांबूस डोळ्यांच्या ‘भौरी’ची, तिच्या धुंद करणा-या सौंदर्यामुळे होणारी दुर्दशा, त्याचप्रमाणे इथल्या स्त्रियांना भेडसावणारे अनेक प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत. गरीबी, पुरुषप्रधान संस्कृती, पंचायतीकडून अन्याय, स्त्रिया आणि मजूरांच्या दैन्यावस्थेमुळे पोखरेला समाज यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट म्हणजे केवळ दृश्यानंद नसून तो विचारप्रवर्तकही आहे.
दिग्दर्शक जसबीर बी. भाटी या वेळी म्हणाले की, ‘नर्म विनोदाच्या माध्यमातून प्रखर मुद्दे मांडतानाच, भारतीय ग्रामीण जीवनातील सौंदर्य उलगडण्याची कल्पना आहे. प्रत्येक भारतीय स्त्रीने हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे. माशा या अभिनेत्रीने भौरी म्हणून अप्रतिम काम केले आहे.
चित्रपटातील प्रभावी कलाकारांमध्ये, राष्ट्रीय पुरस्कार विजेते रघुवीर यादव, माशा पौर (पाकिस्तान), आदित्य पांचोली, कुनिका लाल, शक्ती कपूर, मोहन जोशी, मुकेश तिवारी, मनोज जोशी, सीताराम पांचाळ यांचा समावेश आहे. पृथा पाठक आणि मनजीत महिपाल यांच्या गीत रचनांना संजय पाठक यांनी संगीत दिले आहे.