सकाळी ऐन गर्दीच्या वेळी, मध्य रेल्वे मार्गावरील वीज पुरवठा काही मिनिटांसाठी खंडीत झाला आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडले.
मुंबई – सकाळी ऐन गर्दीच्या वेळी, मध्य रेल्वे मार्गावरील वीज पुरवठा काही मिनिटांसाठी खंडीत झाला आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडले.
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सीएसटी ते इगतपुरी आणि सीएसटी ते खंडाळा मार्गावरील वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडीत झाला होता. अनेक गाडया जागीच थांबल्या. त्यामुळे प्रवासी लोकलमध्ये अडकून पडले तर, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.
काहीवेळाने हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असला तरी, वेळापत्रक पुरते कोलमडून गेले आहे. मुंबई-पुणे तसेच कसारा मार्गावरची मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाडया उशिराने धावत आहेत. दुपारी बारावाजेपर्यंत वेळापत्रक सुरळीत होईल असा अंदाज आहे. तो पर्यंत प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल.