नोबेल पुरस्कार पटकावणारी सर्वात तरुण पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिला ‘अमेरिकन लिबर्टी’ पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
वॉशिंग्टन- नोबेल पुरस्कार पटकावणारी सर्वात तरुण पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिला ‘अमेरिकन लिबर्टी’ पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. धर्यशील आणि कर्तृत्ववान पुरुष व महिलांचा दरवर्षी लिबर्टी पदकाने सन्मानित करण्यात येते.
‘प्रतिकूल परिस्थितीला धर्याने सामोरे गेल्याबद्दल, तसेच ज्यांचे मूलभूत मानवाधिकार आणि स्वातंत्र्य नाकारण्यात आलेल्या उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवल्याबद्दल तिला हे पदक देण्यात आले आहे’, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय संविधान केंद्राने म्हटले आहे.