जागतिक महिलादिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या २२ महिलांचा सत्कार महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते रविवारी होणार आहे.
मुंबई- जागतिक महिलादिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या २२ महिलांचा सत्कार महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते रविवारी होणार आहे.
शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी रविवारी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार असून, या प्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पूजा महाडेश्वर, रश्मी ठाकरे आदींसह इतर नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
पूनम पां. पाटील, सुशीला शैलेश पलीचा, वर्षा भावे, शोभा प्रदीप सुतार, संगीता आशिष राव, माधुरी पाटील, डॉ. नुपूर कृष्णन, अर्चना अरुण नाईक, रत्ना बिपीन दोषी, हेमाक्षी अरुण चांदिवले, प्रीती मुकेश वोरा, सीमा रेडकर, जागृती तुषार भानजी, आशा लक्ष्मणराव सावंत-देसाई, ग्रीष्मा किशोर शेट्टी, कश्मिरा भट्ट, आंचल संदेश चव्हाण, सुप्रिया रवींद्र पेंडसे, सुप्रिया सोनार, बेगम रिहाना अहमद, निलाक्षी महेश कुकीयन, सुनेत्रा अजय आदी सत्कारमूर्तीचा यात समावेश आहे