यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांचे प्रवेश १ जूनपासून सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांचे प्रवेश १ जूनपासून सुरू करण्यात आले आहेत. विद्यापीठाचे सुमारे १५४हून अधिक शिक्षणक्रम असून; या शैक्षणिक वर्षात त्यात नवीन २१ शिक्षणक्रमांची भर पडली आहे.
यातील अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध आहेत. यामुळे दहावी-बारावी परीक्षेत अपयश आलेल्यांना हताश न होता नोकरी-व्यवसाय सांभाळून उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, निरंतर शिक्षण, आरोग्य विज्ञान, कृषिविज्ञान या विद्याशाखा आणि शैक्षणिक सेवा विभागाच्या अनेक शिक्षणक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत.
या विद्याशाखांच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमांखेरीज युवावर्गात लोकप्रिय झालेल्या मीडिया क्षेत्रात जाण्यासाठी पत्रकारिता पदवी, पदविका शिक्षणक्रम, बी.ए. (मराठी, हिंदी आणि उर्दू) बी.कॉम. (मराठी आणि इंग्रजी), मानवी हक्क, ग्रंथालय व्यवस्थापन, गांधी विचार दर्शन, ग्राहक संरक्षण, सहकार व्यवस्थापन, हॉटेल आणि पर्यटन व्यवस्थापन, इन्शुरन्स, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, माहिती-तंत्रज्ञान, कॉम्प्युटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर, मोबाईल दुरुस्ती, शिवणकाम, ब्यूटिपार्लर व्यवस्थापन, प्लंबर, फिटर, वायरमन, वाहन दुरुस्ती, औद्योगिक सुरक्षा, शालेय माहिती-तंत्रज्ञान, फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन, सायबर सिक्युरिटी, ऑटोमोबाईल, टीव्ही-व्हीसीडी मॅकेनिक, फायर अँड सेफ्टी इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, अन्नप्रक्रिया आणि संवर्धन, कृषिशास्त्र, शेतीशास्त्र असे वेगवेगळे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
उपलब्ध असलेले अभ्यासक्रम
रिक्षा, टॅक्सीचालक नेहमीच दुर्लक्षित असतात. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून उच्च शिक्षण देऊन समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी बी.ए. (रोड ट्रान्सपोर्टेशन), उद्योग जगताच्या आधुनिक गरजांसाठी सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रॉडक्शन आणि ऑपरेशन मॅनेजमेंट, बी.कॉम. फायनान्स आणि बँकिंग, लष्करी जवानांसाठी पूर्वतयारी आणि बी.ए., यंत्रमाग कामगारांच्या कौशल्याला समाजमान्यता देण्यासाठी बी.ए. इन टेक्स्टाईल, घरोघरी गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कर्मचा-यांसाठी बी.ए. ग्राहक सेवा, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचा-यांसाठी तसेच अधिका-यांसाठी बी.ए. (पोलीस प्रशासन), नेव्हल डॉकयार्ड कर्मचा-यांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका, सलून व्यवसाय पदविका, बी.एस्सी. (इंडस्ट्रियल ड्रग्ज सायन्स) आणि एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने बी.ए. (पब्लिक सव्र्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सव्र्हिसेस) हे शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही शिक्षणक्रम मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांतही उपलब्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. (इंडस्ट्रियल सायन्स) तसेच बी.एस्सी. (ड्रग सायन्स) शिक्षणक्रम ल्युपिन फार्मास्युटिकलच्या सहकार्याने सुरू आहे. तसेच (एम.कॉम., एम.एस्सी.) विषय संप्रेषण, बी.एड., एम.एड., बी.ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदवी/पदविका असे अनेक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. यापैकी संगणकाचे बहुतेक शिक्षणक्रम ऑनलाईन आहेत. याशिवाय सेवांतर्गत शिक्षकांसाठी
बी. एड., एम.एड., शालेय व्यवस्थापन पदविका, एम.ए., बी.टेक. (मरिन इंजिनीअरिंग), एम.ए. (लोकप्रशासन) इत्यादींचा समावेश आहे.
मुक्त विद्यापीठाची वैशिष्टय़े
मुक्त विद्यापीठाने आजपर्यंत आपल्या प्रत्येक शिक्षणक्रमाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षणक्रमांवर भर दिलेला आहे. शिक्षणक्रम शुल्कात अध्ययन साहित्य, तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, वेब रेडिओ, दृक्श्राव्य माध्यम आणि मोबाईलद्वारे मार्गदर्शन, पुढील शिक्षणाच्या (व्हर्टिकल मोबिलिटी) उपलब्ध, कमवा व शिका योजनेचा लाभ, एकावेळी अधिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्याची संधी, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण केल्यास याच वर्षी प्रथम वर्ष पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेता येईल. अशा विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यास त्यांना बारावी शैक्षणिक अर्हतेचे अर्थात पोलीस शिपाई भरती वा सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील नोक-यांत किंवा बढतीत संधी अथवा अन्य लाभ मिळू शकतात.
व्यवसायाभिमुख नवीन शिक्षणक्रम
या शैक्षणिक वषार्पासून निरनिराळ्या विद्या शाखांतर्गत २१ नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यात आलेत. त्यात बीबीए (बीपीएम), बी.एस्सी. (सीएसए), डिप्लोमा इन बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट, अॅडव्हान्स डिप्लोमा इन बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सायन्स, इंडस्ट्रियल कॉम्प्युटर सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन, बीबीए (बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट), चर्मकला कौशल्ये विकसन, मूल्य शिक्षण, पदव्युत्तर पदविका डिप्लोमा इन ई-एज्युकेशन इन डिजिटल सोसायटी, बी.एस्सी. (जनरल), बी.एस्सी. (नॉटिकल सायन्स), एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स आणि एम. एस्सी. (एनव्हायरमेंटल सायन्स), अॅक्युप्रेशर (प्रमाणपत्र), डिप्लोमा इन अॅक्युप्रेशर आणि हॉस्पिटल असिस्टंट तसेच बी.एस्सी. (ऑटोमोबाईल टेक्निक्स), बी.एस्सी. (कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस), बी.एफ.ए. (चित्रकला/ मूर्तिकला/सिरामिक), एनर्जी ऑडिट अॅड मॅनेजमेंट, एमबीए (फॅशन बिझिनेस) या शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
कमवा व शिका योजनेंतर्गत शिक्षणक्रम :
औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या सहकार्याने शिका व कमवा योजनेंतर्गत विद्यावेतन आणि नोकरीची संधी असलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात बी.एस्सी. (इंडस्ट्रियल ड्रग सायन्स), डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ड्रग सायन्स, हॉस्पिटल साहायक, डिप्लोमा इन फार्मा मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग, अभियांत्रिकी पदविका, बीबीए (बीपीएम), बी.एस्सी. (सीएसए) आणि डिप्लोमा इन बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट या शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
घरपोच पुस्तके – या शिक्षणक्रमासाठी विद्यार्थाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक महिन्याच्या कालावधीत अध्ययन साहित्य घरपोच पाठवण्यात येईल.
ऑनलाईन सेवा – विद्यापीठाच्या निरनिराळ्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेपासून निकालापर्यंत सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवण्यात येणार आहेत. यासाठी राज्याच्या विविध भागांत सुमारे ५००हून अधिक ऑनलाईन सेवा केंद्रे असतील.
प्रवेश प्रक्रियेची माहिती
प्रवेश प्रक्रिया : १ जून ते ३० जून २०१५
विलंब शुल्क : रु. १००/- सह १ जुलै ते २३ जुलै
अतिविलंब शुल्क : रु ५००/- सह २४ जुलै ते २५ ऑगस्ट २०१५
(पदव्युत्तर शिक्षणक्रम सत्र पद्धती व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील शिक्षणक्रम वगळून)
दरम्यान, कृषिविज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांसाठीची अंतिम मुदत १५ जून २०१५ पर्यंतच असून विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
आपल्या आवडत्या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-यांनी त्वरित जवळचे अभ्यास केंद्र, विभागीय केंद्रांवर अथवा (०२५३) २२३१७१४, २२३१७१५, २२३०२२७ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाची ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळास भेट द्यावी. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही शंका/अडचणी असल्यास ycmou.ac.in या संकेतस्थळावर उजव्या बाजूच्या खालील कोप-यात ई-मेल बेस सपोर्ट प्रवेश विभागनिहाय उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करून माहिती विचारू शकतील.