अमेरिकेतील न्यूटाऊन शहरातील कनेक्टीकट एलिमेंटरी शाळेत शुक्रवारी एका माथेफिरुने केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला यात २० निष्पाप मुलांचा समावेश आहे.
न्यूटाऊन – अमेरिकेतील न्यूटाऊन शहरातील कनेक्टीकट एलिमेंटरी शाळेत शुक्रवारी एका माथेफिरुने केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला यात २० निष्पाप मुलांचा समावेश आहे. अँडम लांझा असे या माथेफिरुचे नाव असून, त्याची आई नॅन्सी लांझा या शाळेत शिक्षिका आहे.
या हल्लेखोरांचा मृतदेह पोलिसांना शाळेच्या आवारात सापडला असून, गोळीबारानंतर त्यानेही स्वत: आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना त्याच्याकडे दोन हॅण्डगन सापडल्या आहेत. कनेक्टीकट हायस्कूलमधील दोनवर्गात घुसून त्याने बेछूट गोळीबार केला. हल्ल्याचे नेमेक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अँडम मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घटनेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या डोळयातही अश्रू तरळले. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. पिडीत कुटूंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. अमेरिकेत अशा घटना वाढल्या असून, त्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील ही पहिली घटना नसून यावर्षातील माथेफिरुकडून गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २००७ मध्ये व्हर्जिनिया येथील शाळेत माथेफिरुने केलेल्या बेछूट गोळीबारात ३३ जणांचा मृत्यू झाला होता.