हिंदू पंचागांनुसार पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो.
मुंबई – हिंदू पंचागांनुसार पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. यंदा ही अमावस्या पाच सप्टेंबर रोजी आहे. त्याच्या पूर्वसंध्येला चार सप्टेंबर रोजी मातृदिनानिमित्त ‘प्रहार’च्या वतीने ‘आई असते श्रावण’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी सहा वाजता मुंबई, प्रभादेवी भागातील रवींद्र नाटय मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे व सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील जिजाई महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांची प्रमुख उपस्थिती आहे. या वेळी विख्यात समाजसेविका चंदाराणी कोंडाळकर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये स्मिता व आरती तळवलकर, वंदना व अभिजीत गुप्ते तसेच टेस्ट टय़ूब बेबी तज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर व डॉ. रोहन हे सहभागी होणार आहेत. या वेळी श्रीधर फडके, श्रीरंग भावे, माधुरी करमरकर या प्रसिद्ध गायक कलाकारांचे गीतगायनही सादर केले जाणार आहे. याशिवाय ‘गौरव महाराष्ट्राचा’ कार्यक्रमातील नम्रता सुतार यासुद्धा आपली कला सादर करणार आहेत. संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असून संकल्पना व सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती ‘मिती क्रिएशन्स’ची आहे.