पाचवेळा जगज्जेती ठरलेली आणि लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित चित्रपट तिच्या जन्मगावी म्हणजेच मणिपूरमध्येच प्रदर्शित होणार नसल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली – पाचवेळा जगज्जेती ठरलेली आणि लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित चित्रपट तिच्या जन्मगावी म्हणजेच मणिपूरमध्येच प्रदर्शित होणार नसल्याची चर्चा आहे.
मणिपूरमध्ये २००० पासून हिंदी चित्रपट आणि कार्यक्रम दाखवण्यावर बंदी आहे. या बंदीमुळेच मेरी कोमचा हा चित्रपट मणिपूरमध्ये दाखवण्यात येणार नसल्याची चर्चा आहे.
येत्या पाच सप्टेंबरला संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उमंग कुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रियंकासोबतच सुनील थापा, दर्शन कुमार, शिशिर शर्मा यांच्याही भूमिका आहेत.