सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणा-या म्हाडाचा अर्थसंकल्प गुरुवारी जाहीर होणार आहे.
मुंबई- सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणा-या म्हाडाचा अर्थसंकल्प गुरुवारी जाहीर होणार आहे. गेल्या अर्थसंकल्पात म्हाडाने ३ हजार ८६२ कोटी ५७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला होता. मुंबई, पुण्यासह आपल्या सर्व सात मंडळांमार्फत ६ हजार ९६६ घरांची निर्मिती करण्याकरता एक हजार ३२४ कोटी २३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या घरांसाठी किती तरतूद केली जाणार, याकडे लक्ष सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरवर्षीच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद केली जाते. यंदाच्या सोडतीत घरांची संख्या कमी असल्याने अर्थसंकल्पात याबाबत काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे. सोडतीनंतर घर लागलेल्या लाभार्थीना ओसी न मिळाल्याने शिवाय इतर अडचणींमुळे दोन ते अडीच वर्षे घरांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ओसीसह सोडत काढण्याचा विचार म्हाडाचा आहे. या अर्थसंकल्पात याबाबत नियोजन व तशा तरतुदी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा फार मोठी तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात नसेल, असे सांगण्यात येते.
I HAVE 118 HECTOR PLACE