म्हाडाच्या तिन्हीही मंडळाचे सभापती विधानसभा निवडणुकीत हरल्याने नवीन सभापतीपदासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई – म्हाडाच्या तिन्हीही मंडळाचे सभापती विधानसभा निवडणुकीत हरल्याने नवीन सभापतीपदासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई मंडळाचे सभापती युसूफ अब्राहनी हे मानखुर्द मतदारसंघातून, आर. आर. मंडळाचे प्रसाद लाड शीव कोळीवाडा मतदारसंघातून आणि कोक ण मंडळाचे माणिक जगताप हे महाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या तिघांचाही पराभव झाल्याने त्यांच्याकडे असलेले सभापतीपदही जाणार आहे.
म्हाडाच्या तीन मंडळांपैकी मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांना या पदावर काम करण्यास बराच कालावधी मिळाला होता. मात्र अवघ्या चार महिन्यांपूर्वी मुंबई मंडळाला अब्राहनी, व कोकण मंडळासाठी दोन महिन्यांपूर्वी जगताप सभापतीपदावर विराजमान झाले होते. अब्राहनी हे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी व जगताप यांची विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी नियुक्ती झाली होती.
मात्र या दोन्ही सभापतींना काम करण्यास एक ते दोन महिन्यांचाच कालावधी मिळाला. आघाडीचे सरकार पुन्हा निवडून आले असते, तर या दोघांनाही पुन्हा संधी मिळाली असती. पण, तसे न झाल्याने त्यांची संधी हुकली आहे. मात्र अजून काही महिने तरी नव्या सभापतींेसाठी प्रतीक्षाच करावी लागेल.