दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य ते साध्य करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात असली तरी काहींनाच ती प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करता येते. आपल्यातील कलागुणांना योग्य ती दिशा देत त्यात उत्तम करिअर करता येते. ज्यांना काही समस्यांमुळे आपली आवड जपता येत नाही, ते पुढे जीवनात आपला आत्मविश्वास गमावून बसतात. अशाच आशयाच्या सकारात्मक कथा विषयावर बेतलेल्या नवीन सिनेमाची निर्मिती ‘यस आय कॅन’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने होतेय. ‘जिगवी प्रॉडक्शन’ निर्मित ‘यस आय कॅन’ चित्रपटाचा मुहूर्त सुप्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या हस्ते नुकताच पार पडला असून, चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. अनेक गाजलेल्या िहदी – मराठी मालिकांच्या दिग्दíशका संगीता राव यांचा चित्रपटदिग्दíशका म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
मुहूर्तप्रसंगी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्यावर मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला असून, राजेश शृंगारपुरे, बाल कलाकार मिहीर सोनी हे कलाकारदेखील यात सहभागी झाले होते. या मुहूर्तप्रसंगी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा द्यायला कॅमेरामन-दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर, हर्षदा खानविलकर, योगेश लखानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महेश कोठारे यांनी, ‘दिग्दíशका संगीता राव ही उत्तम दिग्दíशका असून, ती दिग्दíशत करीत असलेला पहिला सिनेमा नक्कीच चांगल्या प्रकारे सादर करेल’ असा विश्वास व्यक्त करीत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
वडील-मुलाच्या नातेसंबंधांवर आधारित ‘यस आय कॅन’ची कथा असून पटकथा अभिजित गाडगीळ व संगीता राव यांनी लिहिली आहे. संवाद अभिजित गाडगीळ यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे छायांकन नरेन गेडिया करीत असून, संगीत-अक्षय खोत, कलादिग्दर्शन-राजू साप्ते, नृत्यदिग्दर्शन-सिद्धेश पै, ध्वनी-जावेद शेख, कार्यकारी निर्माता-शेखर नागवेकर, संकलन-हरकिरन लाल सिंग अशी इतर श्रेयनामावली आहे. ‘यस आय कॅन’ चित्रपटात राजेश शृंगारपुरे, नीना कुलकर्णी, मिहीर सोनी यांच्यासह मृणाल ठाकूर व परेश गणात्रा यांच्यादेखील भूमिका आहेत.