राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील सुनिल व्यंकटेश मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई- राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील सुनिल व्यंकटेश मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच सध्याचे महाधिवक्ता डरायस जहांगीर खंबाटा यांचा राजीनामा स्वीकारण्याची शिफारस राज्यापालांना करण्यात येणार आहे.
सुनिल मनोहर यांच्याकडे वकिलीचा २७वर्षाहून अधिक अनुभव आहे. ज्येष्ठ विधीज्ञ अशी त्यांची ओळख आहे. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदीव घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामद्ये त्यांनी वकील केली. मनोहर यांनी उच्च न्यायालयात अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये काम केले आहे.
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत खंबाटा यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.