नधिकृत होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने भाजपाचे आशिष शेलार आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह पाच नेत्यांना नोटीस बजावली आहे.
मुंबई – अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने भाजपाचे आशिष शेलार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपा, मनसे आणि एनसीपीच्या पाच नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
न्यायमूर्ती ए.एस ओका आणि ए.के.मेनन यांच्या खंडपीठाने या पाच जणांना नोटीस पाठवली आहे तसेच सात मे पर्यंत या नोटिशीवर उत्तर देण्याते आदेश त्यांना देण्यात आले आहे.
शेलार आणि राज ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते बाळा नांदगावकर, भाजपाचे मुकुंद कुलकर्णी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी गर्जे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये या नेत्यांनी स्वत: अथवा पक्ष कार्यकर्ते प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय होर्डिंग्ज लावणार नाहीत असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. मात्र त्यानंतरही शहरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकऱणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.