पैशाच्या देवाणघेवाणीतून संजय पाटील या रेती व्यावसायिकाची चाकूने हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास कल्याणमधील कचोरे येथे घडली.
डोंबिवली : पैशाच्या देवाणघेवाणीतून संजय पाटील या रेती व्यावसायिकाची चाकूने हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास कल्याणमधील कचोरे येथे घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी मोबीन ऊर्फ राजा इब्राहिम शेख
याला अटक केली आहे. पाटील यांचा नांदिवली येथे रेतीचा व्यवसाय असून, मोबीन त्यांच्याकडे नोकरीला होता. बुधवारी रात्री त्यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला आणि मोबीनने पाटील यांच्यावर चाकूने वार केले.