डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीदिनाच्या दिवशी हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाच्या आई आणि भावाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीदिनाच्या दिवशी हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाच्या आई आणि भावाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
दादारच्या आंबेडकर भवनात रोहितची आई राधिका आणि भाऊ राजाने हिंदू धर्माचा त्याग केला. आणि बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. यावेळी डॉ. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
रोहित वेमुला हा हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणारा विद्यार्थी होता. १७ जानेवारी रोजी त्याने विद्यार्थी संघटनांच्या राजकारणातून आत्महत्या केली होती.