दिग्दर्शक रोहित शेट्टी हा या पिढीचा मनमोहन देसाई असल्याचे मत बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने व्यक्त केले आहे.
मुंबई – दिग्दर्शक रोहित शेट्टी हा या पिढीचा मनमोहन देसाई असल्याचे मत बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने व्यक्त केले आहे. करीना रोहितची खूप मोठी चाहती आहे.
तिने आतापर्यंत रोहितच्या गोलमाल रिटर्न्स आणि गोलमाल ३ या चित्रपटात काम केले आहे. ‘माझ्या मते रोहित शेट्टी सध्याच्या पिढीचा मनमोहन देसाई आहे. तो खूप चांगला आहे. कोणत्याही अभिनेत्रीला त्याच्यासोबत काम करायला आवडेल. आतापर्यंत त्याच्या दोन ब्लॉकबस्टर सिनेमामध्ये काम करायची संधी मला मिळाली आहे. तर त्याचा सिंघम रिटर्न्सचे चित्रीकरण सुरु आहे’, असे करीना यावेळी म्हणाली.
करीना रोहितच्या सिंघम या चित्रपटात नव्हती मात्र सिंघम रिटर्न्स यामध्ये ती महत्त्वाची भूमिका करत आहे. ती या चित्रपटात एका मराठी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील माझी भूमिका खूप चांगली आहे. रोहितने खास माझ्यासाठी या भूमिकेवर लिहिले आहे, त्यामुळेच हा चित्रपट स्वीकारल्याचे करीना सांगते.