भांडुप व कांजूर रेल्वेस्थानकादरम्यान डाऊन मार्गावर एका दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह रविवारी दुपारी पोलिसांना आढळून आला.
मुंबई – भांडुप व कांजूर रेल्वेस्थानकादरम्यान डाऊन मार्गावर एका दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह रविवारी दुपारी पोलिसांना आढळून आला. या मुलीला धावत्या लोकलमधून फेकून दिल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने, जागीच मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या मुलीची ओळख अद्याप पटली नसल्याने, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. रेल्वे रुळ ओलांडणा-या प्रवाशांना या मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना देण्यात आली. शनिवारी रात्री किंवा रविवारी पहिल्या लोकलमधून हा प्रकार घडला असावा असा संशय कुर्ला रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मुलीचा मृतदेह श्वविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, तिच्यावर विषप्रयोग किंवा गळा दाबून तिची हत्या झाली नसल्याचा अहवाल आल्याने, तिला लोकलमधून फेकून दिले असावे असा अंदाज आहे.