धुवाँधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तीनही मार्गावरील लोकलसेवा शुक्रवारी ठप्प झाल्या.
मुंबई – धुवाँधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तीनही मार्गावरील लोकलसेवा शुक्रवारी ठप्प झाल्या. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ाही त्यामुळे रद्द करण्यात आल्या. मुंबई ते ठाणेदरम्यान रेल्वे फलाटांवर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने लोकल आणि एक्स्प्रेसचाही खोळंबा झाला.
मध्य रेल्वेच्या शीव, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, मुलुंड, नाहूर, चुनाभट्टी, वडाळा स्थानकांत रेल्वे रुळावर पाणी साचल्याने प्रवाशांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. पश्चिम रेल्वेवर माटुंगा येथील धारावी नाल्यातील पाणी रेल्वे रुळांवर शिरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बरचा दिलासा
तीनही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असताना ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत राहिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. ठाणेपर्यंत वाहतूक सुरु असल्याने कल्याण डोंबिवली परिसरातून नवी मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
मुंबईतून जाणा-या लांब पल्यांच्या गाडय़ा रद्द
मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
मुंबई पुणे इंटरसिटी
दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
मुंबई हजूर साहिब नांदेड तपोवन एक्सप्रेस
भुसावळ पॅसेंजर
मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस
वेळापत्रकात बदल
एलटीटी गुवाहाटी ८.०५
सीएसटी भुसावल कोणार्क १५.१०
सीएसटी चेन्नई एक्सप्रेस १४.००
सीएसटी कन्याकुमारी १५.४५
सीएसटी वाराणसी महानगरी ००.१०
अध्र्यावर रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा
सेवाग्राम एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात रद्द
सिंहगड एक्स्प्रेस कल्याण स्थानकात रद्द वाया पनवेल
कोल्हापुर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस चिंचवड स्थानकात रद्द
गाडय़ा अर्ध्यावर रद्द आणि पुढे प्रवास
अहमदाबाद-मुंबई कर्नावटी बोरिवली स्थानकात रद्द
अहमदाबाद-मुंबई डबल डेकर बोरीवली स्थानकात रद्द
सूरत मुंबई फ्लाईंग राणी अंधेरी स्थानकात रद्द
वलसाड-मुंबई अंधेरी स्थानकात रद्द
भुज दादर बोरिवली स्थानकात रद्द
अहमदाबाद-मुंबई पालघर स्थानकात रद्द
पश्चिम रेल्ववरील बदल करण्यात आलेल्या गाडय़ा
मुंबई सेंट्रल नवी दिल्ली राजधानी १०.१०
मुंबई सेंट्रल निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस १८.५५
मुंबई सेंट्रल नवी दिल्ली एसी प्रीमियम स्पेशल १७.४०
मुंबई सेंट्रल आेखा सौराष्ट्र मेल एक्सप्रेस २३.५५