मराठीतील ज्येष्ठ समीक्षक व लेखन प्रा. रा. ग. जाधव यांना २०१५ या वर्षासाठीचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ तसेच पुणे येथील कॉन्टिनेन्टल प्रकाशन या संस्थेस २०१५ वर्षाचा ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
मुंबई – मराठीतील ज्येष्ठ समीक्षक व लेखन प्रा. रा. ग. जाधव यांना २०१५ या वर्षासाठीचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ तसेच पुणे येथील कॉन्टिनेन्टल प्रकाशन या संस्थेस २०१५ वर्षाचा ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
मराठी भाषा समितीच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारा’चे स्वरूप पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. तर तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप आहे.
जाधव यांची निळी पहाट, संध्यासमयीच्या गुजगोष्टी, समीक्षेतील अवतरणे, साठोत्तरी मराठी कविता व कवी, सहित्य व सामाजिक संदर्भ आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते औरंगाबाद येथे २००४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.