बॉलिवुडमध्ये करिअर करण्यासाठी पुण्याहून मुंबईत आलेल्या विदुषी बेर्डे या मॉडेलची हत्या झाल्याचे फॉरेन्सिक अहवालात समोर आले आहे.
मुंबई – अभिनेत्री आणि मॉडेल विदूषी दास बर्डेच्या हत्येप्रकरणी पोलिसांना पती केदारवर संशय होता. मात्र आता तिची हत्या जवळच्या नातेवाइकांपैकी कुणीतरी केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. विदूषीच्या हत्येपूर्वी केदारच्या मोबाइलवर आलेल्या फोनच्या नोंदी तपासणे सुरू आहे. त्यामुळे हा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. तसेच केदारसह, विदूषीच्या मित्र आणि नातेवाइकांचीही चौकशी होणार आहे.
विदूषीच्या हत्येमागे नेमका कोणाचा हात असावा, ती हत्येपूर्वी एका ठिकाणी कशासाठी गेली होती, हे तपासण्याचे काम पोलिस करत आहेत. हत्येबद्दल एका जवळच्या नातेवाईक महिलेवर संशय असल्याचेही समजते. विदूषीचा मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल नुकताच पोलिसांना मिळाला आहे. यात सकाळी नऊ ते साडे दहा या वेळात तिचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. याचदरम्यान केदारला एका नातेवाइकाने फोन केल्याचे समजते. विदूषीकडे दोन मोबाइल होते. दुपारी अडीच आणि सायंकाळी पावणेसातच्या सुमारास याच नातेवाइकाने केदारला फोन करून विदूषीबाबत विचारपूस केल्याचेही समजते. विदूषीच्या हत्येप्रकरणी केदार, नातेवाईक आणि मित्रांच्या चौकशीतून आणखी माहिती मिळणे पोलिसांना अपेक्षित आहे. मात्र हत्येच्या दिवशी सीसीटीव्ही कॅमे-यात दिसणा-या व्यक्तीबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
[EPSB]
अंधेरी येथे मॉडेलची हत्या
अंधेरी डी एन नगरमध्ये राहणा-या मॉडेल विदुषी बेर्डेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
[/EPSB]