निलंबीत सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. तानाजी शिवाजी खांडेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मुंबई- निलंबीत सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. तानाजी शिवाजी खांडेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी मलबारहिल पोलिसांनी त्यांच्या विरोधात आत्महत्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
खांडेकर यांनी स्वत:वर रॉकेल ओतून घेतले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पंढरपुर येथे कार्यरत असताना त्यांच्या कारकिर्दीत एका कंत्राटदाराने ठरल्याप्रमाणे बैलांचा पुरवठा केला नव्हता. तसेच सरकारचे पैसेही बुडवले होते. त्या प्रकरणाचा ठपका ठेऊन त्यांना निलंबीत करण्यात आले होते.
त्यानंतर कंत्राटदाराने सरकारी रक्कम परत केली. पण तरीही खांडेकर यांचे निलंबन मागे घेण्यात आले नव्हते. त्यामुळे निलंबन मागे घेण्यासाठी सरकार दरबारी ते फे-या मारत होते. अखेर हताश होऊन मंगळवारी त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला.