बॉलिवूड़ अभिनेता सैफ अली खान आरोपी असलेल्या मारहाण प्रकरणात मध्यस्थामार्फत तोडगा काढण्याचे निर्देश स्थानिक न्यायालयाने गुरुवारी दिले.
मुंबई – बॉलिवूड़ अभिनेता सैफ अली खान आरोपी असलेल्या मारहाण प्रकरणात मध्यस्थामार्फत तोडगा काढण्याचे निर्देश स्थानिक न्यायालयाने गुरुवारी दिले.
सैफ अली खान मध्यस्थामार्फत तोडगा काढण्यास तयार असला तरी, तक्रारदार इक्बाल शर्माने अजूनही संमती दिलेली नाही. सैफ अली खान गुरुवारच्या सुनावणीला न्यायालयात हजर होता मात्र इक्बाल शर्मा अनुपस्थित होता.
महानगर न्यायदंडाधिका-याने मध्यस्थाची नियुक्ती करण्याचेही निर्देशही दिले. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी पंचतारांकित हॉटेल ताजमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये सैफ आणि त्याचे दोन मित्र बिलाल आमरोही आणि शकील लडाक यांच्यावर एनआरआय उद्योगपती इक्बाल शर्माला मारहाण केल्याचा आरोप आहे. इक्बाल शर्माच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांना अटकही केली होती. नंतर जामिनावर तिघांचीही सुटका करण्यात आली.