Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeमध्यंतरवास्तू वेधस्वागत गणरायाचं!

स्वागत गणरायाचं!

गणपतीसाठी काय सजावट करायची? मखर आणायचं की, स्वत:च काहीतरी थीम तयार करायची? अशा विचारात सर्वजण असतात. सणाच्या आधी कित्येक रात्री जागरण करून ही सजावट केली जाते. दरवर्षी आपली सजावट हटके असावी, असं सगळ्यांनाच वाटत असतं. अशा या लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याची थोडक्यात माहिती.
GANESH-CHATURTHI-DECORATION‘आला आला आला, माझा गणराज आलाऽऽऽ’ असं म्हणत आपण लाडक्या गणपतीचं स्वागत करतो. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सगळ्यांनीच जय्यत तयारी केली आहे. सार्वजनिक गणपतीच्या सजावटीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व घरगुती गणपतीच्या सजावटीलासुद्धा आहे. गणपतीची मूर्ती अगदी आकर्षक घेतली जाते. मग अशी मनमोहक मूर्ती असल्यावर मूर्तीच्या आजूबाजूची सजावटदेखील तशीच आकर्षक लागते. काही जण तर घरगुती गणपतीच्या सजावटीत दरवर्षी थीमनुसार वेगवेगळी सजावट करतात तर काही जण साधेपणाला महत्त्व देतात. काही जण नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सजावट करतात. आपल्या गणपतीची सजावट सगळ्यात सुंदर दिसावी म्हणून सगळेच जण सजावटीकडे विशेष लक्ष देतात. लोकांच्या सजावटीचा वाढता कल पाहून सजावटीच्या साहित्यालाही महत्त्व आलं आहे.

या वस्तूंनाही महागाईची झळ पोहोचली आहे. घरगुती गणपती असो किंवा सार्वजनिक, सजावटीशिवाय गणेशाची प्रतिष्ठापना होणंच शक्य नाही. त्यात सगळ्यांकडेच वेळेचा अभाव असल्यामुळे कमीत कमी वेळात आपल्या लाडक्या गणरायाच्या सजावटीत काय करता येईल याकडेच सगळ्यांचं लक्ष असतं. खर्चाचं बजेट पाहता सजावट करताना सगळ्यांनाच दम लागतोय. तरीही सजावटीसाठी लागणारं साहित्य हे नव्या प्रकारातलं आणि बदलत्या फॅशननुसार घ्यावं, असं सर्वानाच वाटतं.

सजावट करण्यासाठी जास्त ताण घेण्याची गरज नाही. कारण, हल्ली सगळं काही तयार मिळतं. त्यात सगळ्यात जास्त मागणी आहे ती थर्माकोलच्या मखरांना. थर्माकोलचं नक्षीदार मखर दिसायला खूपच सुंदर असतं. विविधांगी डिझाइन आणि आकर्षक रंगसंगतीचा अनोखा मिलाफ म्हणजे मखर. त्यात सहजतेने हाताळता येतील अशी फोल्डिंग मखरंही बाजारात उपलब्ध आहेत. फुलं, बाग, इंद्रधनुष्य, सूर्यफूल, पाळणा असे त्यात विविध प्रकार आहेतच. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही स्वत:देखील अशी सजावट करू शकता. आकर्षक आणि वेगवेगळ्या रंगांच्या ओढण्या घेऊन त्या मूर्तीच्या चहुबाजूंना लावू शकता. त्यावर स्पॉटलाइट सोडू शकता. फुलांची आर्टीफिशिअल वेल किंवा फुलंही तुम्ही आजूबाजूला ठेवू शकता. तुमच्याकडे वेळ आणि खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही स्वत: पुठ्ठय़ांचे चित्र काढलेले देखावे तयार करू शकता आणि त्यावर कृत्रिम वेली आणि फुलं लावू शकता. खर्च करायचा नसेल आणि नैसर्गिक सजावट करायची असेल तर तुम्ही तुमच्या बागेतील फुलांची किंवा शोभेची सुंदर झाडं गणपतीच्या बाजूला ठेवू शकता. गणपतीच्या पाठी असणा-या भिंतीवर सुंदरशी हिरवी किंवा काठापदराची साडी लावून बघा, तीही  मस्त वाटेल. ज्यांना चांगलं चित्र काढता येत असेल त्यांनी मोराचं सुंदर चित्र काढून ते गणपतीच्या पाठच्या भिंतीवर लावावं. अशाच प्रकारे तुम्ही मोरपिसांची सजावटही करू शकता. तुमच्याकडे दीड दिवसांचा किंवा तीन दिवसांचा गणपती येत असेल तर तुम्ही नैसर्गिक फुलांची सजावट करू शकता. या सगळ्या सजावटीमध्ये नैसर्गिक फुलांची सजावट जास्त चांगली दिसते. त्या सजावटीबरोबर चकचकीत कापड घेऊन लावलं तर तेही छान दिसतं. यात आणखी चांगला आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही गणपतीजवळ वेगवेगळ्या आकारातल्या पणत्या लावू शकता. पण असे तेलाचे दिवे लावत असाल तर सतत कोणीतरी घरात असणं गरजेचं आहे. तसंच त्याला लहान मुलांचा हात लागणार नाही, याचीसुद्धा काळजी घ्यावी लागेल. दिव्यांच्या आणि फुलांच्या सजावटीमुळे घरात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कमी दिवसांचा गणपती असणा-यांना तर आणखी गोष्ट करता येईल. बाजारात दुर्वाची घट्ट वीण मिळते. ती वीण तुम्ही गणपतीच्या मागच्या बाजूला लावून त्यावर लाइटिंग केलंत तरी छान दिसेल. दुर्वा किंवा फुलं वर्तुळाकार सजवा आणि ती गणपतीच्या वर लावा. हे वर्तुळ तुम्ही पुठ्ठयाचं तयार करू शकता.

बाजारात गणपतीच्या आजूबाजूला सजवण्यासाठी ब-याच वस्तू मिळतात. त्यात सगळ्यात आकर्षक वस्तू म्हणजे गणपतीचं वाहन उंदीर. गणपतीचं वाहनही तुम्ही त्याच्या बाजूला ठेवू शकता. ज्यांना सजावट करण्यासाठी वेळ नसेल पण खूप हौस असेल त्यांच्यासाठी बाजारात सजावटीच्या तयार वस्तू आहेतच. त्यासाठी थोडी रक्कम जास्त मोजायची व तयार वस्तू फक्त नेऊन मांडायच्या. अशीही काही मंडळी आहेत जी घरात येऊन सजावटीचं सामान आण्यापासून ते सजवण्यापर्यंत सगळं काही करून देतात. आपल्याला जसं हवं आहे तसं तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता.

लाइटिंग कशी कराल?

कोणताही सण असो, घरात लाइटिंग करायलाच हवं. त्यात गणपतीच्या सणात तर त्या लाइटिंगला जास्त महत्त्व असतं. घराच्या खिडकीला लाइटिंग तुम्ही करू शकता. तसंच गणपतीच्या आजूबाजूला वेगवेगळ्या आकारात लाइटिंग करता येईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करा. दाराजवळ लाइटिंग करत असाल तर तुम्ही भितींवर व्यवस्थित खिळे लावून विशिष्ट आकारात किंवा लाइट्सच्या उभ्या माळा सोडू शकता. खूप मस्त दिसेल. लाइटिंगमध्ये रंगीबेरंगी दिवे येतात. तेही तुम्ही गणपतीच्या बाजूला लावू शकता.

गणपतीची मूर्ती घेताना

बरेच जण गणपतीची मूर्ती घेताना ती गोंडस आणि सुंदर आहे का ? याचाच विचार करतात. पण, त्याशिवाय अशा ब-याच गोष्टी आहेत ज्या गणपतीची मूर्ती घेताना लक्षात ठेवायला पाहिजेत. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूर्ती घेताना ती इको फ्रेंडली असावी, हे लक्षात ठेवा. शाडूच्या मूर्तीपेक्षा लोकांना पीओपीच्या मूर्ती जास्त आकर्षक वाटू लागल्यात. पण, या मूर्तीमुळे जलप्रदूषण वाढतं. शाडूच्या किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती पाण्यात लगेच विरघळतात तर पीओपीच्या मूर्तीना दोन ते तीन महिने लागतात. पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून शाडूच्याच मूर्ती घ्याव्यात. घरं खूपच मोठं असेल तर मोठी मूर्ती शोभून दिसते पण शक्यतो लहान मूर्तीच घ्यावी. लहान मूर्ती घेऊन तुम्ही सजावटीवर जास्त भर द्या. तुम्ही सजावट साधीच करत असाल तर मूर्तीचा रंग गडद घ्या म्हणजे सजावटीवर मूर्ती उठून दिसेल.

हे आवर्जून करा..

गणपती म्हटल्यावर सतत पाहुणे मंडळींची ये-जा असते. तसंच अख्खा दिवस कामातच जातो. अशावेळी आपलं घर चांगलं आणि स्वच्छ दिसावं म्हणून आपण खालील गोष्टी करू शकतो.

  • गणपती येण्याअगोदर घर चांगलं स्वच्छ करून घ्यायचं. घरात असलेला पसारा काढून टाकायचा.
  • बैठक खोलीत गणपती असेल तर या खोलीत कमीत कमी वस्तू ठेवाव्यात.
  • पाहुण्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा करावी.
  • प्रसाद देण्यासाठी गणपतीच्या बाजूला एका आकर्षक भांड्यात प्रसाद भरून ठेवावा. जेणेकरून प्रसाद देण्यासाठी वेळ जाणार नाही.
  • घराचे पडदे, चादरी आकर्षक रंगाच्या असू द्या, शक्यतो एकमेकांना मॅचिंग असतील तर छान दिसतील. त्याने घरात प्रसन्नता निर्माण होईल.
  • दारात पायपुसणी ठेवा म्हणजे घरात पाहुणे आल्यावर त्याला पाय पुसूनच येतील. घरात धूळ-माती येणार नाही.
  • सुगंधी अगरबत्त्यांचा वापर करा. त्याने वातावरण प्रसन्न राहिल.
  • घेतलेल्या वस्तू लगेच जागेवर ठेवा, त्याने पसारा होणार नाही व त्या पटकन सापडतील.
  • दिव्यात घालण्यासाठी लागणारं तेल तुम्ही गणपतीच्या जवळच ठेवा.
  • पाहुणे आल्यावर लागणारी फुलं, हळद-कुंकू एका ताटात व्यवस्थित काढून ठेवा.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट