घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असणा-या युनिव्हर्सल मिलच्या कापडाच्या गोदामाला शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली होती.
मुंबई – घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असणा-या युनिव्हर्सल मिलच्या कापडाच्या गोदामाला शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर आता नियंत्रण मिळवले आहे. आगीची माहिती मिळताच फायरब्रिगेडच्या आठ गाडया आणि चार वॉटर टॅंकर तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
घाटकोपर पश्चिमेला युनिव्हर्सल मिलचे कापडाचे गोदाम आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास या गोदामामधून मोठया प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडत होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला. त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.