गुगलच्या स्वयंचलित कारची चाचणी होत असतांना या कारने एका प्रवासी बसला धडक दिल्याने अपघात झाला.
कॅलिफोर्निया- गुगलच्या स्वयंचलित कारची चाचणी होत असतांना या कारने एका प्रवासी बसला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
गूगलचे मुख्यालय असलेल्या कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू येथे १४ फेब्रुवारी रोजी ‘लेक्सस एसयूव्ही‘ या स्वयंचलित मोटारीची चाचणी घेण्यात आली. यावेळी मोटारीने एका प्रवासी बसला धडक दिली.
या संबंधीचा सविस्तर अहवाल गूगलने कॅलिफोर्नियातील वाहन विभागाला सादर केला असून तो सोमवारी ऑनलाइन प्रसिद्ध केला आहे. या अपघातामुळे ही स्वयंचलित कार भविष्यात कितपत यशस्वी ठरेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.