बॉलिवूडमधील अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग गोव्हरच्या लग्नाच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला असून ‘आम्ही लग्न करणार आहोत’, असे एका निवेदनातून जाहीर केले आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हरच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आम्ही लग्न करणार आहोत, असे एका निवेदनातून जाहीर केले आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विटरवरून बिपाशा आणि करणला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ते दोघे लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र, बिपाशा आणि करणने आपण ३० एप्रिलला लग्न करणार असल्याचे सांगितले आहे.
‘ही आनंदाची बातमी तुमच्या बरोबर शेअर करतांना खूप आनंद होत आहे. ३० एप्रिलला आम्ही लग्न करणार असून हा आमच्यासाठी खूप खास दिवस आहे. त्यासाठी आमचे कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी, चाहते आणि शुभेच्छुकांचे मनापासून आभार मानत आहोत,’ असे त्यांनी सांगितले आहे.