आयसीसीच्या एका मुलाखतीत विराट अनुष्काविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
लंडन- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जसा आपल्या तुफानी खेळीमुळे प्रसिद्ध आहे तसाच तो अनेकदा अभिनेत्री अनुष्का शर्माच्या रिलेशनशिपमुळेसुद्धा चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा विराटने अनुष्काबद्दल बोलून सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
विराट आणि अनुष्का दोघांच्या रिलेशनशीपबद्दल अनेक चर्चा होत असतात. कार्यक्रमांना, विमानतळावर हे दोघे एकत्र दिसतात. आता तर विराटने एका मुलाखतीमध्ये अनुष्काबरोबरचे काही स्पेशल क्षण सांगितले आहेत.
‘मी कधी विचारही केली नव्हता की असा दिवस माझ्या आयुष्यात येईल म्हणून आणि तो दिवस आला आणि त्यावेळेस ती माझ्याबरोबर होती, असे सांगून त्याने अनुष्काचे खूप कौतुक केले.
आजपर्यंत आपल्या रिलेशनबद्दल कुठेही न बोलणारा विराट अखेरीस अनुष्काबद्दलच्या नात्यावर बोलला. अनेक अडथळ्यांमधून विराट आणि अनुष्काचे नाते कसे घट्ट होत गेले, हे स्टार स्पोर्टसच्या एका मुलाखतीत विराटने सांगितले. आयसीसीच्या एका मुलाखतीत विराट अनुष्काविषयी दिलखुलास बोलला आहे.