गोरेपणाला सौंदर्य समजण्याचे दिवस आता मागे सरले आहेत. सावळ्या वर्णालाही सुंदर समजण्याचा ट्रेंड आता ‘इन’ आहे. अभिनेत्रींमध्ये तर या सावळ्या वर्णाला चांगलंच महत्त्व आलं आहे. कारण, या रंगामुळे ती अभिनेत्री खरी आणि प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहे. सिनेसृष्टीत आज वेगवेगळे प्रयोग होत असल्यामुळे आणि वास्तवदर्शी चित्रण करण्यावर भर दिला जात असल्यामुळे ज्या अभिनेत्री व्यक्तिरेखांशी साधम्र्य दाखवू शकतात, वास्तवदर्शी वाटतात त्या अभिनेत्रींना प्रेक्षकांकडून अधिक मागणी येत असल्याचं सध्याचं चित्र आहे. प्रेक्षकांनी स्वीकारलेल्या आणि त्यांच्या पसंतीस उतरलेल्या अशाच काही सावळ्या व सुंदर अभिनेत्रींकडे एक नजर टाकू या.
‘परफेक्ट डस्की’ (सावळी तरीही सुंदर) म्हणून दीपिकाचं नाव घेता येईल. कोणत्याही प्रकारची वेशभूषा तिला खुलून दिसते. तिने परिधान केल्यावर या वेशभूषेला ‘ग्लॅमर’ मिळालं नाही तरच नवल! आखीवरेखीव शरीर आणि सौंदर्य ही तिला मिळालेली निसर्गाची देणगीच म्हणता येईल.
बॉलिवूडमधील या प्रतिभासंपन्न अभिनेत्रीच्या सावळ्या सौंदर्याबद्दल आपण काय बोलायचं? ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधील नगमा खातून ते ‘फुकरे’मधील भोळी पंजाबन, तसंच ‘मसान’मधील देवी अशा विविधांगी भूमिकांमधून आपल्या उत्तम अभिनयाने या सावळ्या आणि गुणी अभिनेत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
मधाळ वर्ण असलेल्या अभिनेत्रीकडे पाहताच ‘काय ते सौंदर्य’ असे उद्गार तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहात नाहीत. तिच्या सौंदर्याला चपखल लागू पडेल, असं तिचं शरीरसौष्ठव आहे. रुपेरी पडद्यावरील आपल्या वावराने तिने प्रेक्षकांना सावळ्या वर्णाच्या प्रेमात पडायला लावलं, हे खरं. मोजक्याच चित्रपटांमधून पाहायला मिळणारी ही अभिनेत्री अधिकाधिक प्रेक्षकांच्या भेटीला यावी, एवढीच तिच्याकडून अपेक्षा.
आतापर्यंत फक्त एकाच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सावळ्या ललनेने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. माजी ‘मिस अर्थ (इंडिया)’ असलेल्या या अभिनेत्रीने आणखीन चमकदार कामगिरी करून दाखवावी आणि रुपेरी पडद्यावर चमकून दिसावं, असं प्रेक्षकांना नक्कीच वाटत असणार.
अप्रतिम मॉडेल लूक असणा-या या सुंदरीला चित्रपटगृहातील पडद्यावर पाहातच राहावं, असं वाटतं. मोहक असा तिच्या त्वचेचा वर्ण तिचं व्यक्तिमत्त्व आणखी खुलवतं.
किंग खान अर्थात शाहरूख खानसमवेत बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी या ललनेने फ्रेंच चित्रपटातून अभिनय केला आहे. ‘फॅन’ चित्रपटातील तिची भूमिका फार मोठी नसली, तरी आपल्या या छोटयाशा भूमिकेतून ती भाव खाऊन गेली. प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचं वारेमाप कौतुक केलं.
‘मार्गरिटा विथ अ स्ट्रॉ’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या या अभिनेत्रीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटातून तिने दमदार अभिनय करत सर्वाची वाहवा मिळवली. सौंदर्य आणि गुणवत्ता यांचा मिलाफ असणारी ही अभिनेत्री म्हणजे एक ‘परफेक्ट क्यूट पॅकेज’ म्हणता येईल. ‘फॅन’ चित्रपटात शाहरूख खान समोर असतानाही तिने तोडीस तोड अभिनय करून दाखवत रसिकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.