कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते भरत भगत यांनी आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी सोमवारी आपला वाढदिवस नेरळ-कळंब रस्त्यावरील खड्डे भरून केला.
नेरळ- कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते भरत भगत यांनी आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी सोमवारी आपला वाढदिवस नेरळ-कळंब रस्त्यावरील खड्डे भरून केला. दहा ब्रास खडी आणि ग्रीडच्या साहायाने खड्डे भरले आणि त्यानंतर ते खड्डे रोलरने दाबून वाहनचालकांचा प्रवास सुखकर केला आहे.
कर्जत तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात दयनीय झाली होती. खड्डेमय रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाल्याचे मागील चार महिन्यात झालेल्या अपघातावरून स्पष्ट होत आहे. त्यात नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर प्रामुख्याने नेरळ रेल्वे फाटक ते अवसरे या भागापयर्ंत रस्त्यावरील खड्डय़ांनी वाहनचालक त्रस्त झाले होते.
शेवटी ही स्थिती नेरळ कळंब रस्त्याने दररोज प्रवास करणारे भरत भगत यांना पाहवत नव्हते. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेरळ-कळंब रस्त्यावरील खड्डे स्वत: रस्त्यावर उभे राहून भरून आपला वाढदिवस अनोख्य पद्धतीने साजरा केला. खड्डे भरण्यासाठी दहा ब्रास खडी आणि ग्रीड आणण्यात आले होते. त्याचवेळी खड्डे भरल्यानंतर तात्काळ त्यावरून रोलर फिरविला जात होता. त्यामुळे खड्डेदेखील व्यवस्थित भरले जात होते.
भगत यांच्या या सामाजिक बांधीलकीबद्दल त्यांचे वाहनचालक कौतुक करीत आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त यावर्षी देखील रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील भजनी बुवांची भजन स्पर्धा आयोजित केली आहे. तो कार्यक्रम अवसरे येथील स्वातंत्र्यसैनिक भगतमास्तर यांच्या स्मारकाजवळ होणार आहे.
[EPSB]
[/EPSB]