अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या नवनव्या प्रयोगाने आणि विराट कोहलीसोबतच्या नात्याने कायमच चर्चेत असते.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या नवनव्या प्रयोगाने आणि विराट कोहलीसोबतच्या नात्याने कायमच चर्चेत असते. अभिनयात मोठे नाव कमावल्यानंतर अनुष्काने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. निर्मिती क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असतानाच अनुष्का आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. अनुष्का आता डिझायनर अनुष्का म्हणून चाहत्यांच्या समोर येत आहे. तिने गत वर्षभराच्या तयारीनंतर नुकतेच नुश नावाची स्वत:ची सिग्नेचर लाईन लाँच केली आहे.
या अंतर्गत अनुष्काने डिझाईन केलेल्या कपडय़ांना बाजारात आणले जाईल. या कनेक्शनसाठी अनुष्काने स्टाईलपासून फॅब्रिक व कलपर्यंतची निवड स्वत: केली आहे. नुशमध्ये अनुष्काची पूर्ण झलक चाहत्यांना पाहता येऊ शकेल. अनुष्काने आपल्या या ब्रांडच्या लॉन्चचा व्हीडिओ इंटरनेटवरही शेअर केला आहे. अभिनेत्री, डिझायनर आणि निर्माती असणा-या अनुष्काचा आता लवकरच परी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
[EPSB]
[/EPSB]