मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे दिवाळीपूर्वी बुजवून खड्डेमुक्त रस्ते मुंबईकरांना पाहायला मिळतील, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिली.
मुंबई- मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे दिवाळीपूर्वी बुजवून खड्डेमुक्त रस्ते मुंबईकरांना पाहायला मिळतील, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिली.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर खड्डेप्रश्नी अधिकाऱ्याला धमकावणे व मानहानी करणे प्रकरणात अटक असलेले मनसेचे पालिका गटनेते संदीप देशपांडे व नगरसेवक संतोष धुरी यांनी सोमवारी जामीन स्वीकारला.
देशपांडे व धुरी यांच्या सुटकेनंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हे आदोलन थांबले नसून दिवाळीपूर्वी खड्डे न बुजवल्यास अधिका-यांच्या घरी जाऊन फटाके फोडले जातील, असा इशारा मनसेने दिला आहे.
महापालिका रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांना खड्डयात उभे करून ‘या खड्डयांना मीच जबाबदार’अशा आशयाचा फलक देशपांडे व धुरी यांनी त्यांच्या हाती दिला होता. या प्रकरणी अभियंत्यांनी देशपांडे व धुरींविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार दोघांना अटक झाली होती.
त्यानंतर मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, राजन शिरोडकर, पक्ष सरचिटणीस रिटा गुप्ता, आदित्य शिरोडकर, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडेंसह नगरसेवक व पदाधिकारी यांनी पालिका आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेऊन खड्डेप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकांविषयी जाब विचारला.
..तर अधिका-यांच्या घरासमोर फटाके फोडणार
दिवाळीपूर्वी खड्डे न बुजल्यास अधिका-यांच्या घरासमोर फटाके फुटतील, असा इशारा मनसेचे अविनाश अभ्यंकर यांनी दिला आहे. यापुढे खड्डयांमुळे कोणताही अपघात घडल्यास त्याला अधिकारीच जबाबदार राहतील. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असाही इशाराही त्यांनी? दिला आहे.
सपाच्या खड्डेमोजणीने प्रशासनाचे डोळे उघडले
खड्डयांबाबत प्रशासन गंभीर नसल्याने खड्डयांची आकडेवारी खोटी दिली जात आहे. सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी सपाच्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील खड्डयांची मोजणी केली. प्रत्येक खड्डयाला क्रमांक देऊन आकडेवारी किती फसवी आहे, हे दाखवून दिले.