मुंबई महापालिका क्षेत्रात ‘एच पश्चिम’ विभागाच्या कार्यक्षेत्रातील सांताक्रुज पश्चिम परिसरात भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) मुख्यालय व निवासी परिसर आहे.
मुंबई- मुंबई महापालिका क्षेत्रात ‘एच पश्चिम’ विभागाच्या कार्यक्षेत्रातील सांताक्रुज पश्चिम परिसरात भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) मुख्यालय व निवासी परिसर आहे. १ लाख ३७ हजार चौरस मीटर आकाराच्या या भूखंडावर तयार होणा-या कच-यापासून खत निर्मिती करणा-या प्रकल्पाची पाहणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज केली. अतिशय चांगल्या प्रकारे कचरा वर्गीकरण व ओल्या कच-यापासून खत निर्मिती करणारा प्रकल्प उभारल्याबद्दल महापालिका आयुक्तांनी ‘बीएसएनएल’चे अभिनंदन करीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे.
याप्रसंगी बीएसएनएलच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे मुख्य महाप्रबंधक पियुष खरे, महाव्यवस्थापक एस. के. मिश्रा, अधीक्षक अभियंता डी. के. शर्मा; महापालिकेच्या परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर, आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त रमेश पवार, एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्यासह बीएसएनएल आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेने यापूर्वीच जारी केलेल्या निदेर्शांनुसार २० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकारमान असणा-या सोसायटय़ांना ओल्या व सुक्या कच-याचे विभक्तीकरण करून ओल्या कच-यापासून खत निर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार बीएसएनएलच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाच्या मुख्यालय व अधिकारी निवास परिसरात बीएसएनएल द्वारे आपल्या स्तरावर कचरा विभक्तीकरणासह ओल्या कच-यापासून खतनिमिेर्ती करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पात दररोज सुमारे १२० किलो ओल्या कच-यावर जीवाणू आधारित प्रक्रिया करण्यात येऊन कच-यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. तर याच परिसरातील उद्यानामध्ये दररोज तयार होणा-या सुमारे १०० किलो कच-यापासून गांडूळ-खत निर्मिती देखील करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खताचा वापर याच परिसरातील झाडांसाठी करण्यात येत आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या अधिका-यांनी आजच्या भेटी दरम्यान दिली. बीएसएनएल मुख्यालय परिसरात ‘प्लास्टिक क्रशिंग मशीन’ बसविण्यात आले आहे.
[EPSB]
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपची कोंडी करणारे वक्तव्य केले आहे.
[/EPSB]