शुक्रवारी झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली. भाजप नगरसेविकेने मांडलेल्या तहकुबीला महापौरांनी गांभीर्याने न घेता पुन्हा सभा सुरू करून विषय मंजूर करून घेतल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी सभा त्याग करत महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कल्याण- शुक्रवारी झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली. भाजप नगरसेविकेने मांडलेल्या तहकुबीला महापौरांनी गांभीर्याने न घेता पुन्हा सभा सुरू करून विषय मंजूर करून घेतल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी सभा त्याग करत महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
डोंबिवलीतील फ प्रभाग समिती सभापती खुशबू चौधरी यांनी पालिका अधिकारी प्रभाग समिती सभेला गैरहजर राहात असून यामुळे प्रभागातील कामे होत नाहीत. यासाठी चौधरी यांनी सभा पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्याची मागणी करत सभा तहकुबी मांडली होती. या तहकुबीवर प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसतानाही महापौरांनी केवळ ५ मिनिटे सभा तहकूब करून पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू केले.
महापौरांच्या या कृतीचा निषेध करत भाजप नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभा त्याग केला. यानंतर सर्व नगरसेवक महापौरांच्या विरोधात घोषणा देत खाली येत पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. तर यावेळी शिवसेना नगरसेविकांनी देखील महापौरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
महापौरांनी संविधानाच्या विरोधात कारभार करत प्रश्न मंजूर केले असून महापौर पालिका अधिका-यांना पाठीशी घालत आहेत. महापौरांनी महिला नगरसेविकांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेविकांनी सभात्याग केल्याची माहिती भाजप गटनेते वरुण पाटील यांनी दिली.
तर सभागृहात सभा तहकुबी मंडण्यात आली होती, तेव्हा सभा तहकुबी दिली. मात्र सभा सुरू झाल्यावर पुन्हा त्याच विषयावर सभा तहकुबी मंडण्यात आली तेव्हा एका विषयावर दुस-यांदा तहकुबी घेता येत नाही. तसेच विषय पत्रिकेत महत्त्वाचे विषय होते म्हणून तहकुबी नाकारून सभा सुरू केली असल्याचे महापौरांनी सांगितले.
[EPSB]
दिवाळी म्हणजे सण, नात्यांचा.. उत्सव दिव्यांचा.. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रेटिजनाही दिवाळी आपल्या कुटुंबीयांसोबत, मित्र- परिवारासोबतच साजरी करायला आवडते.. काहींना शूटिंगच्या शेडय़ूलमधून ही संधी मिळते तर बहुतांश कलाकारांना सेटवरच दिवाळी साजरी करावी लागते.
[/EPSB]