१८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘राष्ट्रीय लोकसाहित्य परिषद’ आणि ‘परंपरा महोत्सव २०१६’ या तीनदिवसीय राष्ट्रीय लोकसाहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई- शाहीर अमरशेख जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहीर अमरशेख अध्यासन, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ व इंडियन फोक लोअर काँग्रेसतर्फे १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘राष्ट्रीय लोकसाहित्य परिषद’ आणि ‘परंपरा महोत्सव २०१६’ या तीनदिवसीय राष्ट्रीय लोकसाहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सांताक्रूझ, कलिना, विद्यानगरी संकुलातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात ही परिषद रंगणार आहे. या परिषदेचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव व सिडकोचे महाराष्ट्र राज्य व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते होईल.
तर प्रख्यात समीक्षक डॉ. विजय तापस, प्रख्यात कवयित्री अरुणा ढेरे, प्रसिद्ध लोकसाहित्यिक प्रा. डॉ. जवाहरलाल हांडू या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे व सहाय्यक प्राध्यापिक डॉ. मोनिका ठक्कर यांनी केले आहे.
कुठल्या दिवशी काय?
पहिल्या १८ ऑक्टोबर सायंकाळी ७.३० वाजता प्रसिद्ध शाहीर आदिनाथ बापूराव विभुते यांचा पोवाडा, शांती चेलक यांची त्यांना साथ लाभेल. नेक मोहम्मद निजाम खाँ लंगा हे राज्यस्थानी लोकसंगीत सादर करतील. त्याशिवाय भरतदान गढवी हे डायरो गायन तर पद्मश्री भारती बंधू हे कबीरवाणी सादर करतील.
१९ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३० वाजता झेबा बानो कव्वाली सादर करणार आहेत. २० ऑक्टोबरला शाहीर विभुते पोवाडा गायन करतील. नेक मोहम्मद निजाम खॉँ लंगा राजस्थानी लोकसंगीतातील विविध पैलू गाण्याद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडतील.