मनोरुग्णांकडून एकाग्रतेने आकर्षक वस्तू बनवून त्यांच प्रदर्शन भरवणे ही स्पृहनीय बाब आहे, मनोरुग्णालय बदलत असून लोकांनी आता त्यांच्याकडे सकारात्मक भावनेने एका वेगळ्या नजरेने बघणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.
मुंबई- मनोरुग्णांकडून एकाग्रतेने आकर्षक वस्तू बनवून त्यांच प्रदर्शन भरवणे ही स्पृहनीय बाब आहे, मनोरुग्णालय बदलत असून लोकांनी आता त्यांच्याकडे सकारात्मक भावनेने एका वेगळ्या नजरेने बघणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शासनाच्या आरोग्य विभाग, उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे व प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात मनोरुग्णांनी दिवाळी निमित्त तयार केलेल्या हस्तकला, वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
आरोग्य मंत्री म्हणाले, अशाप्रकारचे उपक्रम अत्यावश्यक आहेत. जिल्हास्तरावरही असे उपक्रम भरवावे, अशा सूचना संबधितांना दिल्या असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले. या प्रदर्शनात मनोरुग्णांनी तयार केलेले विविध आकर्षक वस्तूंचे वीस स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यात पेपर बॅग, फाईल्स, पुष्प गुच्छ, आकाश कंदील, पणत्या, दागिने, पेंटींग, पेपर प्लेट्स, आदींचा समावेश आहे. यात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे १६, पुणे व रत्नागिरी रुग्णलयातील रुग्णांचे प्रत्येकी दोन स्टॉल लावण्यात आले आहेत. यासह मानसिक तणाव, त्यांचे परिणाम, लक्षणे, काळजी यावर जनजागृती करण्यासाठी प्रदर्शनी स्थळी विविध पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांंनी कार्यालयीन मन:स्वास्थ यावर मार्गदर्शनपर पथनाट्य सादर केले.
मनोरुग्णांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे, आवडीप्रमाणे काम देवून विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. यामुळे त्यांच्यातील कौशल्याचा विकास तर होतोच पण त्यांचे मानसिक स्वास्थ ठीक होण्यास मदत होते व ते लवकर बरे होतात. अनेक रुग्णालयांमध्ये फाईल्स, स्टेशनरी बनविण्याचे काम केले जाते. यामुळे रुग्णांच्या विकास होण्यात मदत तर होतेच शिवाय रुग्णालयांना बाहेरून स्टेशनरी आणावी लागत नाही. आता बऱ्याच रुग्णालयांकडे फाईल्सच्या ऑडर देखील सुरू झाल्या आहेत. हे उपक्रम मोठ्या औषधांची कामे करतात यातून रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. व्यवसाय उपचाराअंतर्गत या उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मुंबई मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, ठाणे प्रादेशीक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर रावखंडे आदी उपस्थित होते.मंत्रालयात मनोरुग्णांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन!
[EPSB]
‘एफटीआयआय’मध्ये अनुपम खेर यांची ‘सरप्राईज एंट्री’
एफटीआयआयचे नूतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये अचानक ‘एन्ट्री’ घेतली. त्यांची ही एन्ट्री विद्यार्थी आणि कर्मचा-यांसाठी आश्चर्यकारक होती. मात्र, अनुपम खेर यांच्या वागणुकीने सर्वांसाठीच हा सुखद धक्का ठरला.
[/EPSB]