नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावरून एका चिमुरड्याचे अपहरण झाले असून ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.
नवी मुंबई- नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावरून एका चिमुरड्याचे अपहरण झाले असून ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावर भरदुपारी ही घटना घडली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेत शोध सुरू केला आहे.
वाशी रेल्वे स्थानकाजवळ अपहरण झालेल्या चिमुरड्याची आई वडापाव विकरत घेत होती. यावेळी तिने त्या मुलाला आपल्या बाजुला उबे केले होते. मात्र वडापाव घेतल्यानंतर तिने पाहिले तर तिचा चिमुरडा बाजुला नव्हता. तिने सर्वीकडे शोधाशोध केली. मात्र चिमुरडा सापडला नसल्याने अखेर तिने पोलिसात धाव घेतली.
पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक व्यक्ती त्या चिमुरड्याला घेऊन जात असल्याचे दिसले. ही व्यक्ती दारुच्या किंवा अंमली पदार्थाच्या नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.