केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) देशात २३ नवीन केंद्र सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रात चार अतिरिक्त केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) देशात २३ नवीन केंद्र सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रात चार अतिरिक्त केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.
सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्येही ही अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी नीट परीक्षा देशभर ८० शहरांमध्ये घेतली जात असे. पण आता २३ नव्या केंद्रामुळे २०१७ ची नीट परीक्षा १०३ शहरांमध्ये होणार आहे.
आतापर्यंत राज्यात नीटसाठी मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक या सहा ठिकाणीच परीक्षा केंद्रे होती. आता आणखी चार केंद्र मिळाल्याने राज्यातील नीटच्या केंद्रांची संख्या दहावर पोहोचली आहे. शासनाच्या या निर्णयाचे विद्यार्थी वर्गाने स्वागत केले आहे.
नीटसाठी नवी केंद्र
- आंध्र प्रदेश – गुंटूर
- आंध्र प्रदेश – तिरुपती
- गुजरात – आणंद
- गुजरात – भावनगर
- गुजरात – गांधीनगर
- कर्नाटक – दावणगिरी
- कर्नाटक – हुबळी
- कर्नाटक – म्हैसूर
- कर्नाटक – उडपी
- केरळ – कन्नूर
- केरळ – थ्रिसूर
- पंजाब – अमृतसर
- राजस्थान – जोधपूर
- तामिळनाडू – नमक्कल
- तामिळनाडू – तिरुनेलवेली
- तामिळनाडू – वेल्लोर
- उत्तर प्रदेश – गोरखपूर
- पश्चिम बंगाल – हावडा
- पश्चिम बंगाल – खरगपूर
महाराष्ट्रातील नवी चार केंद्र
- महाराष्ट्र – अहमदनगर
- महाराष्ट्र – अमरावती
- महाराष्ट्र – कोल्हापूर
- महाराष्ट्र – सातारा
#NEET 2017 will be conducted from 23 new cities in the country @JPNadda #CBSE pic.twitter.com/hTsdmobfW0
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar)
Earlier #NEET was conducted from 80 cities and with 23 new cities, #NEET 2017 will now be conducted from 103 cities @JPNadda #CBSE (2/3)
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar)