बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचे चाहते तिला पुन्हा हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने सध्या आपल्या हॉलिवूडमधील मालिका आणि चित्रपटांवर लक्ष केंद्रित केल्याने ती बॉलिवूडला फारशी वाटय़ाला येत नाही. पण, प्रियांकाचे चाहते तिला पुन्हा हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, ही ‘बेवॉच गर्ल’ लवकरच मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत काम करताना दिसण्याची शक्यता आहे. अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावरील बायोपिक असलेल्या ‘सारे जहाँ से अच्छा’ चित्रपटात ती दिसण्याची शक्यता आहे.
आमिर आणि प्रियांका चित्रपटासाठी तयार झाल्यास पहिल्यांदाच ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसेल. काहीच दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळीच्या गुस्ताखीया सिनेमात ती झळकणार अशी चर्चा होती मात्र ती चर्चा पुढे घेली नसल्याचे खुद्द प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे.
सिनेमा कोणताही असो. ग्लोबल गर्ल त्यात असणे ही तिच्या चाहत्यांकरिता पर्वणीच ठरणार आहे.