बॉलिवूड अभिनेता पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्याच्याविरोधात खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.
मुंबई- बॉलिवूड अभिनेता पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्याच्याविरोधात शेजा-यांनी खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा करत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बॉलिवूडमध्ये संजू बाबा पार्टी करण्यात प्रसिद्ध आहेत. पण रात्री उशिरापर्यंत पार्ट्या केल्याचा त्रास त्याच्या शेजा-यांना होत आहे. ‘पाली हिल रेजिडेंट’ परिसरात संजय दत्तने पार्टी आयोजित केली होती. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली असून उशीरापर्यंत ही गाणी सुरूच होती.
याचा त्रास शेजा-यांना होत असल्याने त्यांनी खार पोलीस स्थानकात फोनवरून तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.