बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरूख खानला २०१२ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर शिवीगाळ केल्या प्रकरणी दिलासा मिळाला आहे.
मुंबई- बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरूख खानला २०१२ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर शिवीगाळ केल्या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी शाहरूखला अखेर क्लिन चीट दिली आहे.
‘२०१२ मध्ये शाहरूख दारूच्या नशेत नव्हता तसेच त्याने कोणतेही अपशब्द वापरलेले नाही,’ असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक असणा-या शाहरूखने १६ मे २०१२ मध्ये कोलकात्याच्या विजयानंतर आपल्या मुलांसह मित्रांबरोबर मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला सुरक्षारक्षकांना अडवले. त्यावेळी त्याने सुरक्षारक्षकांसह एमसीएफच्या पदाधिका-यांबरोबर हुज्जत घातली. याची गंभीर दखल घेत एमसीएने त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घातली होती.
केकेआर आणि मुंबई इंडियन्समधील सामन्यानंतर हा वाद झाला होता. शाहरुखवर २०१७ पर्यंत स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती.
[EPSB]
शाहरुखसाठी वानखेडेचे दरवाजे उघडले
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत शाहरुख खानच्या वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशावर घातलेली पाचवर्षांची बंदी उठवण्यात आली आहे.
वानखेडेवर जाता येणार नसल्याने शाहरुख निराश
कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबईत होणारा सामना ‘याचि देही याचि डोळा’ पाहता येणार नसल्याने संघमालक शाहरुख खान निराश झाला आहे. [/EPSB]