नववर्ष २०१६ मध्ये गीता उपासनी यांनी एक संकल्प केला.. तो म्हणजे नित्यनियमाने शिवचरित्र अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा..! २४ डिसेंबर २०१५ला त्यांनी एक फेसबुक पेज उघडले अन् व्हॉट्सअॅपवर नावनोंदणी सुरू केली.
महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे पारायण त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून तो ऑडियो १ जानेवारीपासून प्रतिदिनी एकेक या पद्धतीने पाठवू लागल्या. आज अनेक शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी त्यांच्या आवाजातील शिवचरित्र ऐकवले जाते.
काही गावांमध्ये तर पहाटे ते ध्वनिमुद्रित संपूर्ण गावच नित्यनेमाने ऐकतं. अनेक देवळांमध्ये एकत्र जमून पारायण श्रवण केलं जातं. शेकडो जणांनी केवळ या प्रकल्पासाठी म्हणून व्हॉट्सअॅप समूह बनवलेत अन् ते नियमितपणे प्रसारित आहेत आणि या माध्यमातून आज शिवचरित्र कित्येक लाख लोकांपर्यंत प्रतिदिनी पोहोचत आहे, याचं गीता उपासनी यांना खूप समाधान वाटतंय.
त्याचप्रमाणे त्यांचे वडील आणि गुरू चारुचंद्र उपासनी यांनी लिहिलेले लेख, संस्कृत कांचं त्यांनी केलेलं सुबोध मराठीतील रूपांतरसुद्धा या माध्यमातून त्या लोकांपर्यंत नेत आहेत. त्यांच्या या संकल्पाला सहा महिने पूर्ण झाली आहेत.
ईश्वरी कृपेनी आजपर्यंत एकही दिवस पारायण प्रसारात खंड पडला नाही. त्यांच्या आवाजातील शिवचरित्र लाखो लोकांपर्यंत पोहोचवणा-या सहस्रवधी शिवभक्तांचे त्या कृतज्ञतापूर्वक आभार मानतात. आता आणखी एक नवीन उपक्रम त्या लवकरच आपल्यासमोर आणणार असून, त्याची यथायोग्य माहिती फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर तुम्हाला मिळेलच.
त्यासाठी त्यांचे फेसबुक पेज अवश्य लाईक किंवा शेअर करा. तसंच पेजवर असलेल्या invite friends….. या पर्यायाचा उपयोग करून आपल्या मित्र यादीतील शिवभक्तांना अन् देशभक्तांना पेज like….. करायला सांगा.
पेज लिंक :-
https://m.facebook.com/Geeta-Charuchandra-Upasani-1651490445102879/?ref=bookmarks