मुंबई येथील ‘जीवनाधार फाऊंडेशन मुंबै’च्या वतीने दरवर्षी तीन दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचे प्रदर्शन केले जाते.
मुंबई- ‘जीवनाधार फाऊंडेशन मुंबै’च्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘जीवनाधार मुंबै भूषण’ पुरस्कार या वर्षी प्रसिद्ध पत्रकार, ज्येष्ठ कीर्तनकार आणि संवेदनशील कवी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर झाला आहे. संत साहित्याच्या प्रसारातून त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबई येथील ‘जीवनाधार फाऊंडेशन मुंबै’च्या वतीने दरवर्षी तीन दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचे प्रदर्शन केले जाते. या वर्षी हा महोत्सव १८, १९ आणि २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला. १८ सप्टेंबर २०१७ रोजी परळ येथील दामोदर हॉलमध्ये होणा-या सोहळ्यात ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
कीर्तन हे मंदिरातील उपचार न राहता ते प्रबोधनाचे साधन व्हावे, यासाठी शामसुंदर महाराज प्रयत्नशील आहेत. पर्यावरण रक्षण, स्त्री सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आदी विषयांवर ते कीर्तनातून प्रबोधन करतात. २०१५ साली मराठवाडय़ातील दुष्काळामुळे शेतक-यां च्या आत्महत्या वाढल्या तेव्हा शामसुंदर महाराजांनी कीर्तनातून शेतक-यां ना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजेश खाडे यांनी सांगितले.
[EPSB]
[/EPSB]