दिग्दर्शक आर. बाल्की त्यांच्या चित्रपटांतून प्रेम, नाते वेगळ्याच दृष्टीने दाखवण्याचा प्रयत्न करतात. ‘चीनी कम’मध्ये वयस्क गृहस्थ त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो.
मुंबई- दिग्दर्शक आर. बाल्की त्यांच्या चित्रपटांतून प्रेम, नाते वेगळ्याच दृष्टीने दाखवण्याचा प्रयत्न करतात. ‘चीनी कम’मध्ये वयस्क गृहस्थ त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो.
‘पा’मध्ये एका विचित्र आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाचे त्याच्या आई-वडिलांवरील अनोखे प्रेम. ‘की अॅण्ड का’मधील नवरा-बायकोचे अनोखे नाते. बाल्की दरवेळी प्रेम आणि नाते एका अनोख्या पद्धतीने पडद्यावर दाखवतात.
आता बातमी अशी आली आहे की, बाल्की लवकरच त्यांच्या पुढील चित्रपटाची तयारी करत आहे. यात अक्षय कुमार आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत असणार आहेत.
विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चनही या चित्रपटात असणार आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी मागील महिन्यात बाल्की यांनी सोनमची भेट घेतली.
या वेळी त्यांनी चित्रपटाबाबत सविस्तर चर्चा केली. सोनमला या चित्रपटाची संकल्पना इतकी आवडली की तिने त्वरित या चित्रपटासाठी होकार दिला. या चित्रपटाचे नाव ‘स्लाईस ऑफ लाईफ’ असून पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.