महाबळेश्वरच्या पाचगणी येथे दोन एसटी गाडयांची धडक होऊन भीषण अपघात झाला.
पाचगणी- महाबळेश्वरच्या पाचगणी येथे दोन एसटी गाडयांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याचवेळी या दोन एसटी गाड्या एकमेकांना धडकल्या आणि अपघात झाला. या अपघातात ४२ जण जखमी झाले.
जखमी झालेल्या प्रवाशांना महाबळेश्वर ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर ग्रामीण आणि जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.