अद्वितीय नृत्यशैलीकरिता लोकप्रिय असलेला भारताचा सध्याचा युवा सुपरस्टार टायगर श्रॉफला गायनाचे खूळ लागले आहे! असे घडले की, अभिनेता ‘द वॉईस इंडिया किड्स’ या शोमध्ये आला होता आणि त्याने शोमधील लहान गायकांच्या गायनाशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न केला.
अद्वितीय नृत्यशैलीकरिता लोकप्रिय असलेला भारताचा सध्याचा युवा सुपरस्टार टायगर श्रॉफला गायनाचे खूळ लागले आहे! असे घडले की, अभिनेता ‘द वॉईस इंडिया किड्स’ या शोमध्ये आला होता आणि त्याने शोमधील लहान गायकांच्या गायनाशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न केला.
अयात शेख, जिच्या ब्लाईन्ड ऑडिशन परफॉर्मन्स व्हीडिओने १० दशलक्षहून अधिक व्ह्यूजसह सोशल मीडियावर धुमाकूळ निर्माण केली आहे, टायगरला पाहून ती त्याच्यावर खूपच भाळली आणि तिने निरागसपणे मंचावर तिच्यासोबत गाणे गाण्याकरिता टायगरला विनंत केली.
या गोड मुलीला नकार कोण देईल! टायगरसुद्धा नकार देऊ शकला नाही. त्याने तिची विनंती मान्य केली आणि तिच्यासोबत गाण्याकरिता मंचावर धाव घेतली. जोडीने टायगरचा चित्रपट ‘बागी’मधील ‘सब तेरा’ हे गाणे सादर केले. ही पहिलीच वेळ आहे, जेथे टायगर राष्ट्रीय टेलिव्हिजनवर गाणार आहे.
फक्त एवढेच नाही! तो अयातसोबत बॅले डान्ससुद्धा करणार आहे आणि ते देखील त्याच्या गुडघ्यांवर. सेटवरील एका सूत्राने सांगितले, ‘‘बॅटल्स राऊंडमधील अद्भुत अयातचा परफॉर्मन्स पाहून टायगर तिच्यावर इतका प्रभावित झाला की, त्याने मंचावर जाऊन तिच्यासोबत त्याचा चित्रपट ‘बागी’मधील ‘सब तेरा’ गाणे सादर केले.
नेहमी टायगरचा डान्स पाहणारे दर्शक त्याचे गायनकौशल्य पाहून पूर्णत: अचंबित झाले आणि अयात त्याच्यासोबत गाणे सादर करताना दिसली.’’ नृत्यामध्ये निपुण असलेल्या या अॅक्शन हीरोचे गायनकौशल्य पाहणे, ही निश्चितच आनंददायी बाब असेल. तुम्ही याकरिता उत्सुक आहात का? टायगरचे गायनामधील पदार्पण २७ ऑगस्ट रोजी ‘द वॉईस इंडिया किड्स’ शोमध्ये, शनिवार व रविवार, रात्री ९ वाजता, फक्त अॅण्ड टीव्हीवर.