संजय लीला भन्सालींच्या ‘गब्बर’ या चित्रपटात चित्रांगदा सिंह आयटम सॉँग करताना दिसणार आहे.
मुंबई – संजय लीला भन्सालींच्या ‘गब्बर’ या चित्रपटात चित्रांगदा सिंह आयटम सॉँग करताना दिसणार आहे.
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट ‘रामना’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रंगदाने या आधीही अक्षय कुमारसोबत ‘देसी बॉइज’ या चित्रपटात काम केले आहे.
याशिवाय तिने अक्षयच्या ‘जोकर’ या चित्रपटातही आयटम सॉँग केलं होतं. त्यामुळे आता लवकरच चित्रांगदाचे नृत्यकौशल्य पुन्हा एकदा ‘गब्बर’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.