कधी नव्हे; तो रोहित शेट्टी परवा अभिनेत्री कृती सेनन हिच्यावर नाराज झाला. कारण काय सांगितलं गेलं तर.. कृती सेननचे मित्र!
कृती सेननचे मित्र! जे ‘दिलवाले’ या चित्रपटाच्या सेटवर आले होते व को-स्टार शाहरूख खानला भेटण्यासाठी उतावीळ होते. साहजिकच दिग्दर्शक रोहित शेट्टीला ही बाब अजिबात रुचली नाही आणि तो नाराज झाला. या घटनेनंतरचे तीन दिवस रोहित याबाबत कृतीला काहीच बोलला नाही. पण त्यानंतर मात्र न राहवून त्याने कृतीकडे याबाबतची नाखुशी जाहीर केलीच.
‘हिरापंती’फेम कृतीला जेव्हा समजलं की, रोहित आपल्यामुळे नाराज आहे, तेव्हा तीदेखील अपसेट झाली.
खरं तर रोहितला चित्रपटाच्या टाइमटेबलमध्ये किंचितही फारकत नको होती. अशात सेटवर आलेल्या या अनोळखी पाहुण्यांनी म्हणजेच कृतीच्या मित्रांनी असा गोंधळ घातला.
या प्रकरणावर नंतर पडदा पाडून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं तरी.. रोहितची नाराजी काही लपून राहिली नाही.
असो. कृती सेनन आणि वरुण धवन याआधीच ‘दिलवाले’चं चित्रीकरण पूर्ण करून झाले आहेत. तर शाहरूख खान आणि काजोल लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लागणार आहेत.