धावत्या लोकलमधून खाली पडल्याने रोहिणी कांबळे (३०) नामक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी कोपर- दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
डोंबिवली : धावत्या लोकलमधून खाली पडल्याने रोहिणी कांबळे (३०) नामक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी कोपर- दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
डोंबिवली पूर्वेतील कमला इमारतीत राहणा-या रोहिणी डोंबिवलीत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत काम करत होत्या. सकाळी कामानिमित्त डोंबिवलीहून मुंबईला जात असताना लोकलमधून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रक रणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.